मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे शुक्रवारी (ता. ९) रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामन्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे पार पडला.
कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड,पारनेर, हवेली, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोते वर्ग उपस्थित होता. या भागातील कलगीतुऱ्याचा सर्वात मोठा महोत्सव असतो. सदर कार्यक्रमाला लोक उस्फूर्तपणे देणगी देतात. कोरोना काळातील दोन वर्षाचा खंड वगळता या कार्यक्रमला खंड पडला नाही. पौराणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी विषयावरती कलगीतुरा म्हणणारे गायक व त्याची साथीदार बहारदार कार्यक्रम करतात. लोणी मधील पंचरास मंडळीनी या कार्यक्रमाची सुरुवात नांदीने केली.
सदर कार्यक्रमासाठी सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, माजी प्राचार्य वसंत वाळुंज , उद्योजक संतोष वाळुंज, सरपंच सागर जाधव, सहारा उद्योग समूह समूहाचे नामदेवराव वाळुंज, समाज भूषण कैलासराव गायकवाड, शिवाजी गेनभाऊ शिनलकर, बबनराव चौधरी, सदस्य रुक्मिणी वाळुंज आदी मान्यवर उपस्थित उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलगीतुरा अभ्यासक लोणी गावचे माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी केले.
सवाल जवाबा चे योग्य परीक्षण करून प्रश्न उत्तर बरोबर आहे की नाही हे श्रोत्यांना समजावून सांगतात. कलगी तुरा कार्यक्रमास माझे खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, भगवानराव वाघ, सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलिस पाटील संदीप आढाव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संतोष पडवळ, हैबतआढाव, माजी चेअरमन सतीश थोरात, बाळासाहेब आदक, बबन दादा वाळुंज, जगनराव लंके, बाळासाहेब गायकवाड इत्यादी मंडळींनी सहकार्य केले. लोणी ग्रामस्थांनी व कलगीतुरा मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारगाव कारखाना पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक रमेश इचके, सचिन डामसे, रामभाऊ वाळुंज बंदोबस्त साठी हजर होते.
लोणीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन…
नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…
नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…
नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…
नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…