kalgitura

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

महाराष्ट्र

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी येथे होत असतो. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कलंगीतुऱ्याचा महोत्सव भरतो अंदाजे दहा ते पंधरा हजार श्रोत्यांचा जनसमुदाय हजर असतो.

पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदार इथे बहारदार कार्यक्रम सादर करतात. गेल्या 28 वर्षापासून कोरोनाचा दोन वर्षाचा कालखंड वगळता या कार्यक्रमाला खंड पडलेला नाही. सदर कार्यक्रमासाठी लोक उत्स्फूर्तपणे देणगी देतात. नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमा मध्ये शाहीर आपल्या हिंदू धर्माच्या पौराणिक कथा व नवीन विषयावर गीते त्यां ठिकाणी सादर करतात.

कार्यक्रमांमध्ये शाहीरांनी केलेल्या सवाल-जवाबाची माहिती सूत्रसंचालन करणारे उद्धवराव लंके हे श्रोत्यांना सविस्तर सांगतात. सदर कार्यक्रमाची सुरुवात लोणी गावातील लोकनाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले कलावंत आपल्या नांदीने करतात. सर्व कार्यक्रमाचे नियोजन कलंगी तुरा मंडळ व लोणी ग्रामस्थ करत असतात.

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…