kalgitura

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

महाराष्ट्र

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे.

कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी संपन्न होतो. सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कलगी तुरा महोत्सव चालतो. अंदाजे दहा हजार ते बारा हजार पब्लिक उपस्थित असतात.

पौराणिक राजकीय सामाजिक ऐतिहासिक आदि विषयावर कलगीतुरा म्हणणारे गायक व त्यांचे साथीदार त्यांचे साथीदार हा कार्यक्रम बहारदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य गेले सत्तावीस वर्षापासून यामध्ये कोरोनाचे दोन वर्षाचा कालखंड सोडता खंड पडलेला नाही. या कार्यक्रमाकरिता लोक उस्फूर्तपणे देणगी देतात.

नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमाने लोकांना आपल्या हिंदू धर्माच्या पौराणिक कथा नवीन विषयावर अनेक गीते शाहीर सादर करतात. कार्यक्रमाची सुरुवात गावामधील लोकनाट्य मध्ये काम करणारे गावातील कलावंत गणगवळण सादर करतात. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते.