११ जिल्ह्यांतील ८३ मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा
मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला सेनेतर्फे १५ ते १६ जूनदरम्यान राज्यव्यापी ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा आयोजित करण्यात आला आहे. महिला सेनेच्या वरिष्ठ नेत्या तीन स्वतंत्र टीमद्वारे ११ जिल्ह्यांतील ८३ विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून संघटनात्मक आढावा घेणार आहेत.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांनी या दौऱ्याची माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. मनिषा कायंदे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, शायना एन.सी. आणि शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.या दौऱ्यात महिला सेनेच्या शाखा, उपशाखा, विभाग, तालुका व जिल्हास्तरीय संघटनात्मक नियुक्त्यांचा आढावा घेतला जाणार असून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनाही संघटनेत स्थान देण्याबाबत चर्चा होणार आहे.
महिला नेतृत्वाला अधिक बळकटी देणे, आगामी निवडणुकांसाठी संघटना सक्षम करणे आणि महिला कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे नेत्यांनी सांगितले. दौऱ्याचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि खासदार Dr. Shrikant Shinde यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…