महाराष्ट्र

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले.

“कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा समाचार घेतला.

“रुग्णालय की मृत्यूचा सापळा?”

आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाची अवस्था मांडताना मैथिली ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, रुग्णालयाची इमारत अत्यंत जर्जर झाली असून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते.

“छताचे प्लास्टर कोसळत आहे, भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत, पावसाळ्यात वॉर्डमध्ये पाणी साचते. अशा परिस्थितीत गर्भवती महिला आणि लहान मुलांवर उपचार केले जात आहेत. हे लोकांच्या जीवाशी खेळणे नाही का?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.

“मी उत्तराने समाधानी नाही”

सरकारच्या लेखी उत्तरात रुग्णालयाची इमारत फारशी खराब नसून केवळ किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, यावर मैथिली ठाकूर यांनी कडाडून टीका केली.

“मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिले आहे. एका छोट्याशा खोलीत आरोग्य सेवा सुरू आहेत. एकही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाही. आधी दोन डॉक्टर होते, तेही आता नाहीत. मग दरवर्षी वाढणारा आरोग्य बजेट नेमका खर्च होतो कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आरोग्यमंत्र्यांना भावनिक साद

भाषणादरम्यान त्यांनी काहीसा भावनिक सूर लावत आरोग्यमंत्र्यांना थेट आवाहन केले. “मी लहानपणापासून त्यांना काम करताना पाहतेय, त्यांच्याबद्दल आदर आहे. पण जनतेचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. एखाद्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने नवीन इमारत उभारावी,” अशी कळकळीची मागणी त्यांनी केली.

सभागृहात खडाजंगी

मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ खडाजंगीचे वातावरण निर्माण झाले. विरोधकांनी बाके वाजवत त्यांना पाठिंबा दिला, तर सत्ताधारी पक्षातील सदस्य काहीसे अस्वस्थ दिसले.

आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देताना राज्यातील जर्जर इमारतींची ओळख पटवून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, मैथिली ठाकूर यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नमूद केले.

तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीवर भाष्य

पहिल्यांदाच विधानसभेत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या मैथिली ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीवरही भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

बिहारच्या राजकारणात पहिल्याच अधिवेशनात ठसा उमटवणाऱ्या मैथिली ठाकूर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात आरोग्य विभागाच्या कामकाजावर अधिक लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago