महाराष्ट्र

मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा; राज ठाकरेंवर कोश्यारींचा पलटवार

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधत “राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत” असा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी टीका करत, “लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात” असा टोला लगावला होता. सत्ता गेल्यानंतर हेच लोक येतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमाला आलेली सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरलेली नसतील. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो, मात्र ते मोदींना जास्तच घाबरले आहेत असे मला वाटते.”

“मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीराम सर्वांना समान होते तसेच नरेंद्र मोदीही सर्वांना समान आहेत,” असा सल्ला कोश्यारी यांनी दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही आहात, घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा आरोप केल्यावरही कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर टीका झाली, पण अजितदादांनी कधी माझ्यावर टीका केली नाही. मी त्यांना कधीच विसरणार नाही,” असे ते म्हणाले. घातपाताचा संशय असल्यास सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

नाशिक दौऱ्यात बोलताना कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचा उल्लेख केला. “जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसाच कॉरिडॉर नाशिकमध्येही व्हावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago