महाराष्ट्र

मराठी ही सामर्थ्यशाली भाषा आहे मराठी भाषिकांवरील अन्याय, दादागिरी सहन केली जाणार नाही

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ चे मराठी भाषा व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत आणि उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य , जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर यांच्या वतीने ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ५व ६ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या मुंबई ग्रंथोत्सव २०२४ च्या उदघाटन प्रसंगी ना सामंत म्हणाले की,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय आहे. त्यांच्या कामाबद्दलं कौतुक आहे, येथील ग्रंथ अंकीकरणासाठी सहकार्य केले होते .याही पुढे केले जाईल.वाचनसंस्कृती केवळ जोपासली जात नाही, तर ती अंगीकृत केली पाहिजे. आगामी काळात ग्रंथालयाकडे येणाऱ्या वाचकांची संख्या वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ना सामंत पुढे म्हणाले की,बौद्धिक विकासासाठी पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. देशभक्तीची बीजे पेरण्याचे कार्य केवळ पालकांनीच नव्हे, तर प्राथमिक शिक्षकांनीही करायला हवे. डिजिटल यंत्रणांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व्हावा, याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केले.

यावेळी “लहान मुलांसाठी “बाल साहित्य संमेलन”, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ” युवा साहित्य संमेलन”, तसेच महिलांसाठी स्वतंत्र “महिला साहित्य संमेलन ” सुरू करणार असल्याची घोषणा ना. उदय सामंत ह्यांनी केली.तसेच मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय किंवा दादागिरी सहन केली जाणार नाही, असेही सांगितले. “जगभरातील भाषांमध्ये मराठीचा १७ वा क्रमांक असून ती एक सामर्थ्यशाली भाषा आहे.

परदेशातील लोकही मराठी शिकत आहेत, याकडे विशेषतः लक्ष वेधले.या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे ताई, सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार , ग्रंथालय संग्रहालय महाराष्ट्र राज्य प्रभारी अशोक गाडेकर, किरण ढंढोरे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर उपस्थित होत्या.यावेळी ग्रंथ दिंडीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.मान्यवर पदाधिकारी, शिक्षक तसेच ग्रंथालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago