महाराष्ट्र

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली.

यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये वाचलेल्या निवडक दिवाळी अंकांतील लेखांचे सोप्या आणि रसाळ भाषेत विवेचन केले.

लक्ष्मण उपाध्ये यांनी मराठी भाषेशी निगडीत दैनंदिन जीवनातील ठळक विसंगती खुमासदार शैलीत मांडत उपस्थितांची दाद मिळवली. पुढे अस्मिता सुतार, रजनी साळुंखे आणि उल्हास कुळकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे भावपूर्ण वाचन केले. शरयू वैद्य यांनी आपल्या काही आठवणी शेअर करत वातावरण अधिक जिवंत केले.

विजया कापडी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार या प्रतिष्ठित साहित्यमानाच्या स्वरूपाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शुभागी सिनकर यांनी कुसुमाग्रजांचे गीत सादर केले, ज्याला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त साथ दिली.

त्यानंतर चिन्मय मायदेव यांनी लेख वाचनासह महाराष्ट्रावर आधारित पोवाडा सादर करत कार्यक्रमाची सांगता रंगतदार पद्धतीने केली. शेवटी भाग्यश्री नूलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोळे व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago