मुंबई: मार्वे चौपाटीवर रविवारी घडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी जीवरक्षक तैनात करण्यात यावेत, तसेच दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.
अस्लम शेख पुढे म्हणाले, जीवरक्षक, झाडांची छाटणी अशा विविध कारणांसाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करते. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. कधीतरी महानगरपालिका त्यांची ही जबाबदारी स्वीकारणार आहे का..?
मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह सोमवारी दुपारपर्यंत सापडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी सागरी जीवरक्षक तैनात करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…