महाराष्ट्र

वटपौर्णिमेच्या दिवशीच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बीड: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला. नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता.

सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी विहिरीत उडी मारून आयु्ष्य संपवलं. या महिलेचा तिच्या सासरच्यांनी घात केला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकानी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं. सासरवास होता तिला. सतत मारहाण केली जात होती. आई-बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा. लग्नाला १० वर्षे झाली होती. ६ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा हिच आमची मागणी आहे.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago