मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला असताना पक्षांतर्गत राजकारण तापलेले दिसत आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली. शरद पवार गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या विषयावर अधिकच खळबळ उडाली आहे.
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. विलीनीकरणाच्या वादावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनीही या विषयावर सार्वजनिक भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्ली भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याच्या बैठकीत सहभाग घेतला. पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या संयुक्त वार्षिक आराखड्याच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या.
राजकीय पातळीवर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाही सुनेत्रा पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या मौनामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …