महाराष्ट्र

मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली

Subscribe व Grievances सुविधा उपलब्ध

मुंबई: आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून मोटार परिवहन विभागाशी संबंधित , एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने एसटी संदर्भातील, तसेच पालकमंत्री धाराशिव म्हणून धाराशिव जिल्ह्याशी निगडित आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जनतेला आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना या संकेतस्थळावर मांडता येतील. त्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून या द्वारे संबंधित तक्रारदाराची तक्रार अथवा सूचना यावर मंत्री महोदयांच्या ‘ रिमार्क ‘ सह योग्य ती कार्यवाही करून त्यांना (संबंधित तक्रारदार) त्याची पोच देण्यात येणार आहे. जेणेकरून पुढील पाठपुरावा त्यांना करणे शक्य होईल. या सुविधेमुळे संबंधितांना आपल्या तक्रारीचे निराकरण होण्याबरोबरच विविध उपक्रम, निर्णय व घडामोडींबाबतची सर्व माहिती तत्काळ मिळणार आहे.

स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा

माझ्या मतदारसंघातील नागरिकांना व मंत्री या नात्याने माझ्या विभागाशी संबंधित जनतेच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना यांना प्राधान्य देत वेबसाईटवर Grievances विभाग (तक्रार निवारण केंद्र) उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून मांडलेल्या तक्रारी सरकार दरबारी प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ! असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. *तसेच लवकर मराठी भाषेत देखील उपरोक्त संकेत स्थळ विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या नव्या डिजिटल उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक वेगवान व पारदर्शक होण्याची अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी

मा. मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

3 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

5 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

5 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

10 तास ago