महाराष्ट्र

सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी: रमेश चेन्नीथला

मुंबई: २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना चेन्नीथला म्हणाले की, पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने निदर्शनास आणून दिले होत. त्यानंतर या संदर्भातल्या लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास येत आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. काँग्रेस पक्ष या संदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच. पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago