महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ; अनंत गाडगीळ

मुंबई: देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते मा आम. अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे.

राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला व आंध्र प्रदेशला प्रत्येकी सुमारे १४ हजार कोटी, मध्य प्रदेशला ११ हजार कोटी, ओडिसाला ७ हजार कोटी तर महाराष्ट्राला मात्र अवघा ८ हजार कोटीं रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची आकडेवारीच गाडगीळ यांनी सादर केली असूनही महायुतीचे नेते यावर का मौन बाळगून आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.

२०४७ पर्यंत ” अमली पदार्थ मुक्त भारत ” करण्याची गर्जना करणाऱ्या पंतप्रधान मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या काळात सुमारे ५.५ लाख किलोचे तब्ब्ल २० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. केंद्र सरकारनीच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांचा एवढा साठा जर पकडला जात असेल तर कुणाच्या राजवटीत अमली पदार्थाचे सेवन वाढल्याचे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही असा उपरोधक टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघ्या काही महिन्यापूर्वीच जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठा वरून मुंबई – पुण्यासारख्या शहरातून महायुती सत्तेवर असताना, सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे सिद्धच होते आहे असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago