महाराष्ट्र

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड यांनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही आक्षेपार्ह भाष्य केले आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सपकाळ यांनी पुढे आरोप केला की, गायकवाड यांच्यावर यापूर्वीही मारहाण, धमकी, वाळू तस्करी आणि जमिनी बळकावण्यासारख्या गंभीर तक्रारी आहेत. तसेच त्यांनी पूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांचाही उल्लेख करत, अशा वर्तनावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बोलताना गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. यापूर्वीही विविध नेत्यांनी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावरून सरकार अशा प्रवृत्तीला समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या प्रस्तावावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मराठी भाषेचे संवर्धन अत्यावश्यक आहे. मात्र, सक्तीऐवजी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठीचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

4 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

11 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

11 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago