महाराष्ट्र

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार

मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

काल मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर संस्थेचे नवल जीत कपुर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago