मुंबई: आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, सरचिटणीस रोहित सावंत व इमरान तडवी, सचिव वैभव पांचाळ व संकेत वाडेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांची जंजिरा बंगल्यावर भेट घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी व गोंधळासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र राज्यात ७ जूनपासून सुरू झालेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींनी ग्रस्त असून, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनःस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. या प्रक्रियेत एकाच खासगी कंपनीला संपूर्ण राज्यभर जबाबदारी देण्यात आल्यामुळे सर्वत्र गोंधळ, विलंब व माहितीचा अभाव दिसून आला आहे.
मुंबई आणि एमएमआर विभागामध्ये लोकसंख्या, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी संख्या लक्षात घेता ही प्रक्रिया स्वतंत्र आणि वेगळ्या तंत्रज्ञान पद्धतीवर राबवली जावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.यासंदर्भात मंत्री मा. भुसे साहेब यांनी सर्व बाबी समजून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मुख्य मुद्दे आणि मागण्या अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात यावी. विद्यार्थ्यांना वारंवार अर्ज किंवा बदल करताना आर्थिक बोजा सहन करावा लागू नये. ‘लाडके विद्यार्थी योजना’ तातडीने लागू करण्यात यावी.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळावा. मुंबई व एमएमआर विभागासाठी स्वतंत्र प्रवेश पोर्टल/प्रक्रिया तयार करण्यात यावी.
स्थानिक गरजांनुसार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल. तांत्रिक अडचणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथकाची नेमणूक करावी.
पालक व विद्यार्थ्यांसाठी त्वरित मार्गदर्शन व समस्या निवारणाची सुविधा असावी. प्रक्रियेतील गोंधळाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. अकार्यक्षमता व हलगर्जीपणाला पाठीशी घालू नये.विद्यार्थी व पालक प्रतिनिधींना प्रक्रियेत सहभागी करून, सुधारणा अधिक सर्वसमावेशक कराव्यात.
“ही केवळ प्रवेश प्रक्रिया नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निर्णायक टप्पा आहे. सरकारने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उघड आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार विचारधारा सदैव विद्यार्थ्यांच्या हक्कांसोबत उभी आहे आणि भविष्यातही ही लढाई अधिक तीव्रपणे लढली जाईल, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ॲड. अमोल मातेले
मुंबई अध्यक्ष,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…