महाराष्ट्र

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे…

नागपूर: शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे.

शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचे ७० टक्के अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान कधीपर्यंत देण्यात येईल असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

तसेच नागपूर शहरात तांदूळासंदर्भातील गैरव्यवहार झाला आहे त्यावर फौजदारी कारवाई कधी होणार असा सवाल देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की, शालेय पोषण आहार संदर्भात प्रलंबित अनुदान हे इंधन व भाजीपाल्याबाबत आहे. संबंधितांना कंत्राटदार यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांना बिल पास करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सवलत दिली आहे.

शालेय पोषण आहाराचे अनुदान देण्यात येईल. तसेच यापुढेही या वर्गाला प्राथमिकता देण्यात येईल. नागपूरमधील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी संबंधित बचतगटाला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. तसेच त्यावर पोलीस आवश्यकतेनुसार कारवाई करत असल्याची माहिती दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

13 तास ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

20 तास ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

3 दिवस ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

3 दिवस ago