महाराष्ट्र

राजकीय नेत्यांवर टीका करावी पण आई वडिलांना शिव्या देणे अयोग्य

मुंबई: राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलतानाडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असे आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पाडले पाहिजे, ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णयच सरकारने काढला आहे. त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते. एकीकडे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणार दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे. ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागत नाही तर सरकारने सर्व नेत्यांना बोलवावे चर्चा करावी मग आम्ही पुरावे देऊ ओबीसींचे काय नुकसान होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले. महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढला आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना काढले जात आहे इतका दोन समाजात द्वेष पसरला आहे. या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही पण जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

भाजप आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पडळकर यांनी जी टीका केली ती म्हणजे आईला शिवी दिली आहे. राजकीय पुढाऱ्यांवर टीका करा पण त्यांच्या आई वडिलांवर बोलणे, अयोग्य आहे ,महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे,कोण त्याला पाठीशी घालत आहे असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago