महाराष्ट्र

‘एपस्टिन फाईल’वरून राजकीय वाद पेटला

मोदींच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेस-वंचितचा नागपुरात धडक मोर्चा

नागपूर: कथित ‘एपस्टिन फाईल’ प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला “अत्यंत गंभीर व लाजीरवाणे” म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-वंचितचा संविधान चौक ते संघ मुख्यालय असा संयुक्त मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला असला तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते संघ मुख्यालय परिसरात दाखल झाले.

“मोदी अमेरिकेपुढे दबावाखाली?” — सपकाळ

सपकाळ म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. व्यापार करार, इंधन दरवाढ आणि संसदेत अनुपस्थिती या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

“१५ दिवसांत जाब विचारा” — आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनीही तीव्र भूमिका घेत मोहन भागवत यांनी १५ दिवसांत मोदींना जाब विचारावा, अशी मागणी केली. डोनाल्ड ट्रम्प आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारवर परराष्ट्र धोरणाबाबतही टीका केली.

फडणवीसांवरही निशाणा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सपकाळ यांनी टीका करत नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून सरकारला जबाबदार धरले. “गेल्या काळात गृहमंत्री असताना कारवाई का झाली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला

संविधान रक्षणासाठी एकत्र — काँग्रेस-वंचित

मोर्चापूर्वी झालेल्या सभेत विरोधकांनी भाजपा-संघावर संविधानविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी विचारधारेत भिन्न असले तरी संविधान, लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र आल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, ‘एपस्टिन फाईल’च्या मुद्द्यावरून राज्यात आणि केंद्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

11 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

18 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

18 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago