क्राईम

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजस्थान ढाबा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सरदवाडी गावच्या हद्दीत असलेल्या राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये ट्रक क्रमांक TN-88-M-1864 उभा होता. त्यावेळी ट्रक चालक बालसुब्रम्हण्यम मुर्गेशन (रा. तामिळनाडू) याने आपला ट्रक निष्काळजीपणे व बेफिकिरीने चालवित असताना, ट्रकच्या मागील चाकाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून वाहन गेल्याची घटना घडली. या अपघातात योगेश आसाराम साठे (वय 29, रा. मालगाव, ता. पस्तुर, जि. जालना) याच्या कंबरेखालील भागावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही तपासात समोर आले आहे. शिरूर पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र किसन बनकर यांनी सरकारतर्फे दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस करत असून, आरोपी ट्रक चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील ढाबा परिसरात सुरक्षिततेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

स्थानिक नागरिकांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पार्किंग परिसरात योग्य प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था व वाहनचालकांवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच महामार्गालगत झोपणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठीही प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. ही घटना केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून मानवी जीविताबाबतची बेफिकिरी किती महागात पडू शकते याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

11 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

18 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

18 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago