मुख्य बातम्या

मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने अवैध्य उत्खनन वाहतुक सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परीसरात अवैध्यरीत्या मुरुम उपसा, वाळू उपसा सुरु असून मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने हे प्रकार सुरु असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे त्याचे कारण ही तसेच आहे. हे मंडल आधिकारी याच भागातील कवठे येमाईचे रहिवाशी असून त्यांचे अनेक वर्षापासून या माफीयांशी घनिष्ठ सबंध आहे. त्यामुळे या भागात डोंगरगण, शिनगरवाडी, टाकळी हाजी या ठिकाणी राजरोसपणे अवैध्य गौण खनिज उपसा व वाहतुक सुरु आहे. तसेच अनेक प्रकारच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठीही हे महाशय नागरीकांकडून भरमसाठ पैश्याची मागणी करत असल्याचे म्हसे येथील काळूराम पवार यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

“शिरुर तालुका डॉट कॉम” च्या बातमीने तात्काळ तलाठी शकील कमलीवाले व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांनी तात्काळ पंचनामे सुरु केले असून बडया माफियांवर खरच कारवाई होणार का? की मंडल आधिकारी त्यांना त्यांचे मीठ खाल्ल्यामुळे कसे वाचवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. मुळातच मुळ गावातील भागात मंडल आधिकाऱ्यांची नियुक्ती देणे चुकीचे असून ओळखीचा फायदा घेत राजरोसपणे विविध कामांमध्ये पैश्याची मागणी होत असून यातून मोठा भ्रष्ट्राचार बोकाळत चालला आहे. या प्रकरणाकडे तहसिलदार, ऊप विभागीय आधिकारी काय भुमिका घेतात याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

 (क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

15 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

15 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

15 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

19 तास ago