महाराष्ट्र

प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन

नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांच्यावर अंबाझरी घाट येथे साश्रू नयनांनी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत योगानंद काळे यांच्या निवासस्थानी भेट देत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तसेच त्यांची पत्नी व कुटुंबियांचे सांत्वन केले.

शनिवारी सकाळी 10.30 वाजता श्री योगानंद काळे यांची प्राणज्योत मावळली. त्यानंतर श्री काळे यांच्या अप्त स्वकि्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मातब्बर लोकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. यामध्ये आमदार प्रवीण दटके, स्व. संघांचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख सुनील देशपांडे, विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख अरविंदजी कुकडे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, ज्येष्ठ कृषी अभ्यासक सी.डी. मायी, बाल जगत चे अध्यक्ष जगदीश, सुनीलजी देशपांडे, रवींद्र भुसारी, माजी राज्यमंत्री विनोद गुडधे पाटील, माजी आमदार प्रा अनिल सोले, गिरीश व्यास, संघांचे नागपूर महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, धरमपेठ शिक्षण संस्था अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडदे, माधव नेत्रालयाचे उपाध्यक्ष निखिल मुंडले, संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, अध्यक्ष भाजपा दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे, लोकववाहिनीचे संपादक प्रवीण महाजन, शिक्षक परिषदेच्या सौं कल्पना पांडे, डॉ मुरलीधर चांदेकर, भाजपा संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, सौं संध्याताई गौतमरे, माजी नगरसेवक संजय बंगाले, माजी नगरसेवक, राजीव हडप, भाजपा शहराध्यक्ष बंटी कुकडे राजेश बागडी, डॉ योगानंद काळे यांचे मानसपुत्र सुधीर दिवे, अरविंद गजभिये आदी मान्यवरांचा समावेश होता.

“काळे सर” म्हणून जनमानसात आपुलकीची भावना निर्माण करणारे योगानंद काळे यांचे जीवन एखाद्या दीपस्तंभासारखे होते, प्रेरणादायी होते अशा सदभावना व्यक्त करत अंबाझरी घाटावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

नेत्रदानाचा संकल्प पूर्ण

विकासाची दृष्टी आणि सहृदयता जपणाऱ्या योगानंद काळे यांनी नेत्रदान करण्याचा निश्चय केला होता. त्यांच्या कुटुंबियांनी तो पूर्ण केला. शनिवारी सायंकाळी माधव नेत्रालयाची चमू योगानंद काळे यांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी नेत्रदानाची कार्यवाही पूर्ण केल.

पार्थिवावर भाजपचा ध्वज

डॉ योगानंद काळे यांनी संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी, कार्यकर्ते घडविण्यासाठी खर्ची घातले. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या ध्वज कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पार्थिवावर पांघरण्यात आला. माजी महापौर राजाभाऊ लोखंडे, विवेक तरासे, प्रमोद तभाने, प्रा. दिलीप दिवे, किशोर वानखेडे, विमलकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

20 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

20 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

1 दिवस ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

1 दिवस ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

1 दिवस ago