महाराष्ट्र

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मंत्रालय, मुंबई यांच्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. समाजातील दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना नव्या आशा देण्याचे सामर्थ्य नेत्रदानामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ३३ अनुदानित विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ५६६ महाविद्यालयांमध्ये तसेच ३४ विनाअनुदानित विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १४७ महाविद्यालयांमध्ये १० जून रोजी नेत्रदान जनजागृती कार्यक्रम व नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“नेत्रदान करा, जीवन उजळवा” हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण केली जाणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः सहभागी होऊन समाजातील इतरांनाही या कार्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago