महाराष्ट्र

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा…

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे 

मुंबई: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, कोकणात होणाऱ्या रिफायनरीच्या विरोधात बातम्या लिहिल्याच्या रागातून पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकार वारिसे हे बारसू येथील रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडशी संबंधित बातम्यांचे कव्हरेज करत होते. याचाच राग धरून रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना व पत्रकारांना धमकावण्याचे काम पंढरीनाथ आंबेरकर करत होता. पत्रकार वारिशे यांची बातमी सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झाली होती आणि त्याच दिवशी दुपारी राजापूर कोदवलीजवळील पेट्रोल पंपासमोर वारिशे यांच्या स्कूटीवर महिंद्रा थार चढवून त्यांची हत्या करण्यात आली. पत्रकार वारिशे यांच्या हत्येसंदर्भात प्रसार माध्यमासह जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पत्रकार संघटनांनीही गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. पत्रकार संरक्षण कायदा असतानाही गुन्हेगारांची हिम्मत वाढलेली आहे. पत्रकाराची हत्या ही लोकशाहीची निघृण हत्या असून पुरोगामी महाराष्ट्रावरचा कलंक आहे. प्रसार माध्यमांना स्वतंत्र व भयमुक्त वातावरणात काम करता आले पाहिजे, पत्रकारांवर हल्ले होत राहिले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कमकुमवत होईल.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार खुलेआमपणे गोळीबार करतात, हातपाय तोडण्याची धमकी देतात, प्राचार्यांना मारहाण करतात. पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावतात पण शिंदे- फडणवीस सरकार मात्र कारवाई करत नाही. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी गुन्हेगाराला अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असेही लोंढे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

11 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

11 तास ago