महाराष्ट्र

संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले.

संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – एस. गेरगे हॉस्पिटल परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “येथील सेवाभावी उपक्रम पाहून मी प्रभावित झाले आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छतेचे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून, नगरसेवक व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्यास स्वच्छतेत आपण नवा उच्चांक गाठू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेमार्फत आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये भविष्यात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

11 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

14 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

14 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago