महाराष्ट्र

मानव विकास परीषदच्या राज्य कामगार युनियन प्रदेशाध्यक्षपदी संदीप कुटे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली आहे. मानव विकास परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर संदीप कुटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्यात कुठेही कामगारांवर अन्याय झाल्यास त्यांना कायदेशीर मार्गाने मदत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल. भांडवलदारां कडून कष्टकरी मजुरांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी यापुढे राज्यभर मानव विकास परीषदेच्या माध्यमातून आवाज उठवला जाईल, असे प्रतिपादन रांजणगाव गणपतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योजक संदीप कुटे यांनी केले.

यावेळी मानव विकास परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, प्रदेश सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवक प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय निफाडे, युवती प्रदेश अध्यक्षा जयश्री अहिरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख अन्सार शेख, संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानुमते मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी कुटे यांची निवड करण्यात आली.

ranjangaon-mutadwar-darshan
शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago