महाराष्ट्र

पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची विक्रमी आवक; १०० टन माल दाखल

पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी आवक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतून तब्बल १०० टन डाळिंब बाजारात दाखल झाले. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबाच्या घाऊक दरात घट झाली आहे.

घाऊक बाजारात प्रतवारीनुसार डाळिंबाला ३० ते ५० रुपये किलो दर मिळत असून, किरकोळ बाजारात मात्र १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पुणे बाजारपेठेतून देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये डाळिंब पाठविले जाते.

बारामती, सांगोला, पंढरपूर, इंदापूर आणि पुरंदर परिसर हा डाळिंब उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. यंदा या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने डाळिंबाच्या बागांना चांगला फायदा झाला आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांना जुन्या बागा काढून टाकाव्या लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बागांची लागवड करण्यात आली. यंदा या नव्या तसेच जुन्या बागांमधून उत्पादन वाढले आहे.

गेल्या वर्षी डाळिंब हंगामात पुणे मार्केट यार्डात दररोज साधारण ५० ते ७० टन आवक होत होती. त्या वेळी प्रतवारीनुसार घाऊक बाजारात डाळिंबाला १०० ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळाला होता. यंदा मात्र आवक वाढल्यामुळे दरात मोठी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

डाळिंब व्यापारी आणि श्री शारदा गजानन अडते संघटनेचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले की, यंदा डाळिंबाचा हंगाम चांगला बहरला आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची आवक होत आहे. समाधानकारक पावसामुळे लागवडही चांगली झाली असून, उत्तम प्रतीच्या मालाला चांगला दर मिळत आहे. आगामी काळात डाळिंबाची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डाळिंब व्यापारी सिद्धार्थ खैरे यांनी सांगितले की, किडीच्या प्रादुर्भावामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाली असून, लाल दाणे, रसाळ आणि आकाराने मोठ्या डाळिंबांना बाजारात चांगली मागणी आहे.

आवक वाढल्याने शेतकऱ्यांना यंदा उत्पादनाचा फायदा होत असला, तरी बाजारभावात झालेली घसरण त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारी ठरू शकते. आगामी काळात आवक आणि बाजारातील मागणी यानुसार डाळिंबाचे दर कसे राहतात, याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

6 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

7 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

10 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

10 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

10 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

10 तास ago