महाराष्ट्र

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टलवरून

संभाजीनगर: महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये आता मोठा बदल होणार आहे! लवकरच प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथपाल यांसारखी पदे देखील ‘पवित्र पोर्टल’ द्वारे भरली जातील. शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

सध्या राज्यात सुमारे २५,००० शिक्षकेतर कर्मचारी पदे मंजूर आहेत, त्यापैकी ९,५०० ते १०,००० पदे रिक्त आहेत. ही भरती २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार केली जाईल. त्यामुळे रिक्त आणि अतिरिक्त पदांची नेमकी आकडेवारी लवकरच समोर येईल.

महत्वाचा पेच: १५ मार्च २०२४ रोजीच्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे आणि त्यावर *’स्टेटस को’ (जैसे थे)* ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

माध्यमिक शाळांमध्ये ८,५०० शिक्षकांची भरती सुरू

दरम्यान, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक पदासाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी संस्थांमध्ये पाठवले आहे. या टप्प्यात साधारणत: ८,५०० शिक्षकांची भरती होणार असून, ३० जूनपर्यंत त्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली.

संस्थांनाच भरावी लागणार शिपाई पदे

शासनाच्या निर्णयानुसार वर्ग-४ मधील पदभरती आता बंद झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाई पद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही. हे पद कायमचे रद्द झाल्याने, शाळांमधील शिपायांची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वत:हून शिपाई पदे भरावी लागतील. यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago