महाराष्ट्र

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या ठिकाणी बिहारमधील Mahabodhi Temple संकुलाच्या धर्तीवर भव्य ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे Sanjay Shirsat यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला Anandraj Ambedkar यांच्यासह संबंधित पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेनंतर सर्वानुमते या जागेचा समाजहितासाठी विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, Dr. Shrikant Shinde यांनी या जागेच्या सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून येथे जागतिक दर्जाचे बौद्ध संकुल उभारण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सुमारे ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, ध्यान केंद्र आणि अत्याधुनिक विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे.

हे संकुल केवळ धार्मिक केंद्र न राहता ज्ञान, संस्कृती आणि संशोधनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, आधुनिक ग्रंथालय, बौद्ध सांस्कृतिक संग्रहालय, डिजिटल रिसर्च सेंटर, अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश असेल.

या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री शिरसाट यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे लवकरच जागेची पाहणी करणार असून, त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.या निर्णयामुळे बुद्धभूमीच्या जागेसंदर्भातील वादावर कायमचा पडदा पडण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सामाजिक ऐक्य, प्रज्ञा, करुणा आणि बंधुतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago