महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचा सन्मान, संघटनात्मक ताकद आणि सशक्त महिला नेतृत्व हेच शिवसेनेचे ब्रीद

सांगली: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान, आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत विविध योजनांची माहिती दिली.

“महिलांना दिलेले वचन म्हणजे आमचं कर्तव्य,” असे ठामपणे सांगत त्यांनी लाडकी बहिण सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, २१०० रुपये अनुदानाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, महिला बचतगटांना आधार देणाऱ्या बँकांची यादी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, “अनेजण शिवसेना शिंदे गट असा उल्लेख करतात पण शिवसेना ही आपलीच आहे, हे आता प्रत्येक कार्यकर्त्याने मनात ठसवणे गरजेचे आहे.”

महिलांच्या आरोग्यावर भर, पंचायत समित्यांत प्रतिनिधित्वाचे आवाहन

डॉ. गोऱ्हे यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांबाबत माहिती दिली. हिमोग्लोबिन, कॅल्शियम, आयर्न तपासणीपासून ते गर्भाशयाच्या आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी महिलांना संधी मिळावी यासाठी संघटनात्मक तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सभासद नोंदणी मोहीमेस चालना

महिलांना संघटनेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत, “प्रत्येक भगिनीने किमान २० नवीन सभासद नोंदणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून पक्षाची ताकद वाढेल आणि स्थानिक नेतृत्व घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा स्वागत सत्कार सांगली जिल्हा संपर्कप्रमुख सुनीता ताई मोरे, रुक्मिणी आंबीगेर, ज्योती दांडेकर, अर्चना माळी, राणी कमलाकर, मनीषा पाटील व आशा पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुनीता ताई मोरे यांनी केले, तर जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर माजी जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. रावसाहेब घेवारे सह संपर्कप्रमुख यांनी देखील यावेळी आपले मनोगत मांडले.

या मेळाव्यादरम्यान महिलांचा मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रवेश सुद्धा झाला, ज्यामुळे सांगलीतील महिला संघटना अधिक बळकट होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

5 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

5 तास ago