मुंबई: महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने असल्याने या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असल्याचे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
पन्नास खोके एकदम ओके..
चड्डी बनियन गँग हाय हाय..
महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो..
दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…