महाराष्ट्र

माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतल पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीतसापडले आहेत. ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे, अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असं म्हणत रोहित पवारांना आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ईडीने कारवाई केली

शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता पवारांच्या नातेवाईकांना कमी किंमतीमध्ये सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप ठेवला गेला आहे. रोहित पवारांसह काही जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहेत. कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही असंही रोहित पवार म्हणाले. तसंच, ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं असा टोलाही त्यांनी लगावाला.

सुरूवातीला ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हत. नंतर, कुणाच्या दबावात आले माहित नाही. नंतर यात माझं नाव टाकण्यात आलं. ईडीला काही यात सापडल नसल्याने चार्ज शीट दाखल केल्याने आता ही लढाई न्यायालयात गेली आहे. ही गोष्ट चांगली झाली. मी चार्च शीटची वाट पाहत होतो. शेशन कोर्टापासून ही लढाई सुरू झाली ती सुप्रिम कोर्टापर्यंत जाईल. ही लढाई मीच जिंकणार. कारण, मी घाबरणारा, पळून जाणारा माणूस नाही. अस्सल मराठी माणूस कधीच भीत नाही हे लक्षात ठेवा.

प्रकरण काय

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडने अवसायनात निघालेला छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला. हा साखर कारखान्याची केवळ ५० कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. नियमांचं पालन न करता हा व्यवहार झाला असून, हा कारखाना जाणूनबुजून कमी किमतीत विकण्यात आला, असा संशय ईडीला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

6 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago