आरोग्य

निरोगी आयुष्याचा रस्ता हा तुमच्या पचनक्रियेतून जात असतो तो कसा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित आणि वजनाशी संबंधित बऱ्याचदा समस्या जर तुमच्या आहारात फायबर प्रमाण योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे त्यासाठी खालील काही सोप्या पद्धती आहेत.

सफरचंदाचा ज्यूस

सफरचंद खाणं आरोग्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढाच याचा ज्यूसही फायदेशीर असतो. सफरचंदाचा ज्यूस सेवन केल्याने पोट साफ राहतं. पोटातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक गोष्टी विष्ठेच्या माध्यमातून बाहेर पडतात.

भाज्यांचा ज्यूस 

भाज्यांचा ज्यूसही आतड्यांसाठी फार फायदेशीर असतो. आतड्या साफ करण्यासाठी पालक, टोमॅटो, गाजर, फूलकोबी, ब्रोकली, भोपळा आणि कारल्याच्या ज्यूसचं सेवन करावं. या भाज्यांच्या ज्यूसने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आतड्या नेहमीच साफ राहतात. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.

लिंबू पाणी

लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याने अॅसिडीटी दूर होऊ पचन तंत्रही मजबूत होतं. या ज्यूसबाबत असं सांगितलं जातं की, याने पोटातील नुकसानकारक बॅक्टेरिया मारले जातात आणि आतड्या चांगल्या साफ होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

13 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago