मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्र अभिवादन केले.
यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी राज्यातील नागरिकांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.
“होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…