आरोग्य

लसूण खाण्याचे उपयोग

१) कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

२) लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात.

३) बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

४) गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

५) किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

६) कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

७) भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

८) भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

९) हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

१०) ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो.

११) लसूण मनाची मरगळ घालवतो.

१२) हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

१३) लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

१४) तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.

१५) लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

१६) अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

१७) डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

१८) ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

१९) शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

२०) संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

२१) लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

3 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

4 तास ago

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

1 दिवस ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

2 दिवस ago