महाराष्ट्र

भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

मुंबई: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३वा नंबर लागतो.

तरुणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक ३४ तर युवती ८० आत्महत्या करतात, असा जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी आहे. यांच विषयावर जागतिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युवकांची देशभरातून भारतातील तरुणांसाठी आत्महत्या प्रतिबंधाला प्राधान्य देणे या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीत शिक्षण मंत्रालय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण भारत सरकार व म्.च्.आय, मुंबई यांच्या वतीने दिल्ली येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, विनायक हेगाणा या महाराष्ट्रातून एकमेव युवकांची निवड करण्यात आली आहे.

विनायक मागील 8 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात उविरतपणे काम करत आहे. शिवार संसद युवा चळवळ उभी करुन ३००० शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे.

आत्महत्या होऊच नये यासाठी “शिवार हेल्पलाइन” या संशोधनपर संकल्पनेतून आतापर्यंत १९५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले आहे. याची राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स, मुंबई, आय.आय.टी मुंबई व निती आयोग भारत सरकार मार्फत ही दखल घेण्यात आली आहे. जगातील १८ देशातून ३२ युवकांमध्ये जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देवून गौरविण्यात आले आहे. विनायकने आतापर्यंतच्या मानसिक आरोग्य व आत्महत्या या विषयावरील योगदानामुळे या राष्ट्रीय सल्लागार परिषदेत तो मार्गदर्शन करणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago