महाराष्ट्र

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याची कक्षा महाराष्ट्रभरात व्यापक होत आहे.ही  बाब लक्षात घेऊन साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, संशोधक , संघटक,चित्रपट नाट्य समीक्षक , सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९८-१९९९ ला मुंबई जिल्हा कार्यवाह म्हणून योगदान देणाऱ्या शीतल करदेकर यांची नियुक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी करण्यात आली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय कार्यवाह माधव अकलंगे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. या नियुक्तीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे तसेच केंद्रीय कार्याध्यक्ष डाॅ प्रदीप ढवळ यांनी करदेकर यांचे अभिनंदन केले आहे. तर केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.या जबाबदारीच्या पदाबद्दल भावना व्यक्त करताना शीतल करदेकर यांनी,”मराठी भाषा व साहित्य समृध्दी, सक्षमीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

57 मिनिटे ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

1 तास ago

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळणार मोठे बळ! एकाच वेळी १,४४० वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल;

मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…

1 तास ago

महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…

1 तास ago