महाराष्ट्र

होर्मुज खाडीत पुन्हा जहाजांची हालचाल सुरू; जगाला मोठा दिलासा

मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा सुरू झाल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग बंद झाल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांसह तब्बल 26 व्यापारी जहाजांना होर्मुज खाडीतून सुरक्षित मार्ग देण्यात आला. काही दिवसांपासून या मार्गावर मोठा तणाव निर्माण झाला होता. अनेक जहाजे खाडीत प्रवेशासाठी प्रतीक्षेत होती, तर काही जहाजांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

होर्मुज खाडी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि एलपीजी गॅस याच मार्गातून विविध देशांमध्ये पोहोचते. त्यामुळे या मार्गावरील तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवत असून भारतालाही त्याचा फटका बसत आहे.

भारतासह अनेक देशांनी पर्यायी मार्ग आणि अतिरिक्त तेलसाठ्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तणाव कायम राहिल्यास इंधन दरवाढ आणि महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. पाकिस्तानमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात लॉकडाऊनसदृश स्थिती असल्याचे वृत्त आहे. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.होर्मुज खाडीतून पुन्हा जहाजांची हालचाल सुरू होणे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब मानली जात असली तरी परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

12 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

16 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

16 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

16 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

16 तास ago