कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील सगळे मातब्बर पुढारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षात शिरुर तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची मोठी फौज आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे कडवट शिवसैनिक अशी लढत होती.
निवडणुकीच्या सुरवातीला शिरुर तालुक्यात एकीकडे दिग्गज पुढारी तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता असेच चित्र दिसत होते. शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावातील मोठा राजकीय पुढारी हा भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षात दिसत होता. मात्र दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षात मात्र प्रत्येक गावातील सर्वसामान्य पण स्वाभिमानी कार्यकर्ते दिसत होते.
कारेगाव (ता. शिरुर) येथील राहुल गवारे हे अशोक पवार यांचे गेल्या पंचवीस वर्षांपासुन कट्टर समर्थक आहेत. कारेगावातील सगळे मातब्बर पुढारी अजित पवार गटात असताना राहुल गवारे, मोहन नवले आणि नवनाथ नवले यांनी कारेगाव मध्ये नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवत डॉ कोल्हे यांना आघाडी दिली. राहुल गवारे हे गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक काम करतात. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते कायम मदत करतात. त्यामुळे गावातील सर्वसामान्य स्वाभिमानी मतदारांनी गवारे यांना साथ देत डॉ कोल्हे यांना आघाडी दिली.
कारेगावातील राहुल गवारे, मोहन नवले, नवनाथ नवले, सयाजी नवले, कैलास ताठे, मयुर कोहकडे, महेश कोहकडे, तुषार कोहकडे, बाळासाहेब नवले, नंदु नवले, संतोष नवले, शिवाजी नवले, नितीन दळवी या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने डॉ कोल्हे यांचा प्रचार केला. त्यामुळे कोल्हे यांना मतांची आघाडी मिळाली. यापुढे विधानसभा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही कारेगाव तसेच शिरुर तालुक्यातही शरद पवार आणि अशोक पवार पॅटर्नचं चालणार अशी सध्या जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे.
शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक
शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान
रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक