शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

मांडवगण फराटा (तेजस फडके) निवडणुकीच्या आखड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळ्याच राजकीय पक्षातील लोक त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात आमच्याही चुका आहेत. असे म्हणतं डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे आज अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होता यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले काही ठिकाणी हेमामालिनी, धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा उभे राहिले. त्यांचा आणि राजकारणाचा काय संबंध तसेच राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा अशी कितीतरी नावे घेता येतील. अमिताभ बच्चन यांनी आधी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर त्यांना कळलं हे आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिरुर लोकसभेला सर्वसामान्य लोकांशी नाळ असलेल्या व्यक्तीला संधी देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर अजित पवार यांची शिरुर तालुक्यात हि पहिलीच सभा होती. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस मी तुमच्याकडे अशोक पवारांच्या पॅनलला मतदान करा अशी विनंती करायला आलो होतो. पण त्यानंतर हा दिवटा असं काही वेडवाकड वागेल अस वाटलं नव्हतं. त्यांनी स्वतःचा मुलगा राज याला कारखान्याचा अध्यक्ष केला. तेव्हा मी म्हणलं होत अरे बाबा याला हि जबाबदारी पेलवेल का…? आणि शेवटी व्हायचं तेच झालं. घोडगंगा कारखान्याला अडचणीतुन मी नक्कीच बाहेर काढील असेही ते म्हणाले.

 

रविंद्र काळे यांनी केली सडकून टिका…

खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यावर टिका करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले, ते आले आणि त्यांनी लोकसभेची निवडणुकही जिंकली. पण लोकांनी केवळ तुमच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळ तुम्हाला निवडुन दिलंय हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी चार वर्षे त्यांनी मतदार संघाकडे दुर्लक्ष केले. तसेच दादा तुम्हीच म्हणाले होते अशोकाच झाड हे एकटच वाढतं, उंच जात ते फळही देत नाही आणि सावलीही देत नाही. आमच्याही शिरुर तालुक्यात हे अशोकाच झाड असच वाढलंय आणि त्याच्या वसव्यामुळे आमचा घोडगंगा कारखाना बंद पडलाय. 25 वर्षे त्यांनी निष्ठावान आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना चटके दिले अशी टिका आमदार अशोक पवारांवर त्यांनी केली.

 

अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे इनकमिंग…

शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी, नागरगाव, आंधळगाव, शिरसगाव काटा, न्हावरे, करडे या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, रमेश थोरात, प्रदीप गारटकर, दिलीप वाल्हेकर, वीरधवल जगदाळे, सुरेश घुले, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, सदाशिव पवार, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, वैशाली नागवडे, केशर पवार, कुसुम मांढरे, मोनिका हरगुडे, श्रुतिका झांबरे, तज्ञिका कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.