मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु…

मुंबई (योगेश शेंडगे): मुंबई येथील आझाद मैदानात आज (दि १५ ) ऑगस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आरटीआय (RTI) कार्यकर्ते अशोक भोरडे (रा. निमगाव म्हाळूंगी ता.शिरूर जि.पुणे) यांनी त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी उपोषण आंदोलनास सुरुवात केली असुन त्यांचे अनेक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव हे त्यांना पाठिबा देण्यासाठी आझाद मैदानात हजेरी लावत आहेत.

अशोक भोरडे यांनी सांगितले की, माझ्या गृहविभाग, महसुल विभाग, चासकमान व पाटबंधारे विभाग, एस आय डी पुणे यांच्या विरोधात न्यायिक मागण्याबाबत तसेच माझे पुर्वी असलेले पोलीस संरक्षण सुडबुद्धीने बेकायदेशीरपणे काढणाऱ्या पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीणच्या जिल्हास्तरीय समितीची सखोल चौकशी करावी. तसेच माझ्या जिवीतास धोका आसल्याने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील इनाम वर्ग ६ ब जमीनीमध्ये बिनशेती परवानगी घेऊन तेथे गोडाऊनचे बांधकाम न करता बेकायदेशीरपणे तुकडे करुन प्लॉटिंग केले म्हणजे शर्थ भंग झाला हि तक्रार अजय मोरे अपर जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांच्याकडे दि ५ मार्च २०२४ रोजी तक्रार करुन पाच महिने झाले तरी कारवाई करत नाही. तातडीने संबंधित तक्रारीवरती कारवाई करण्यात यावी.

चासकमान पाटबंधाऱ्याचे कोरेगाव धानोरे शाखा कालव्यावर इकाई कंपनी, शिक्रापुर (ता.शिरुर जि.पुणे) व युनिक्लिंगर,सणसवाडी कंपण्यांची ४० ते५० मेट्रिक टनाची अवजड वाहने सदर कॅनलच्या साइड पट्यावर उभी असतात. कंपन्याचा कच्चा व पक्कामाल ने आण करणाऱ्या वाहनांची, कर्मचारी बस बेकायदेशीरणे साईड पटट्यावर पार्किंग करत आहे.

याबाबत तक्रार करुनही श्रीकृष्ण गुंजाळ कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे खात्याचे अधिकारी सदर कंपन्यांना पाठीशी घालत आहे. सदर कंपन्या विरुद्ध तात्काळ कारवाई करुन संबंधित अधिकारी यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. कोरेगाव धानोरे शाखेची पोटचारी उजवी ३ ( आर ३) सणसवाडी ता.शिरुर ही चारी सपाट करुन त्यावर अतिक्रमण करुण अरिहंत सी.एन.जी.प्रा.लि.कंपनीने बांधकाम केले असून बांधकाम तात्काळ काढण्यात यावे.

एस.आय.डी.पुणेच्या डी.सी.पी.व ए.सी.पी. यांची सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी. या न्यायीक मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत उपोषण आंदोलन करत आहेत. शासन त्यांच्या न्यायीक मागण्यावर काय निर्णय घेणार याबाबत पुणे जिल्ह्यातील नागरीकाचे लक्ष लागले आहे.

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान

शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago