मुख्य बातम्या

मनसेचे घोगरे यांच्या कडुन रामदास जगतापांच्या चौकशीची मागणी; तर जगताप म्हणतात…

शिरुर (अरुणकुमार मोटे) महसुल विभागातील स्वतः ची किंवा नातेवाईकांची आणि त्यांच्या मार्फत आणलेली कामे तात्काळ करण्यासाठी अहमदनगर येथील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या महसुल कार्यालयात विविध महसुल अधिकारी व कर्मचारी यांना फोन व मेसेज करुन कामे करण्यासाठी वारंवार दबाव आणत असल्याची तक्रार शिरुर तालुक्याचे मनसे संघटक अविनाश घोगरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण दूर व्हावी आणि कामे व्हावीत, या भावनेने मी मदत करत आहे असे रामदास जगताप यांनी म्हटले आहे.

 

शिरुर तालुक्याचे मनसे संघटक अविनाश घोगरे यांनी रामदास जगताप यांची उच्चस्तरीय चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे मुळ शिरुर तालुक्यातील जांबुत येथील रहिवासी आहेत. त्यांनी या अगोदर जमावबंदी आयुक्त कार्यालय, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक, पीएमआरडीए उपायुक्त म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील महसुल विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गाव पातळीवर तलाठी कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दबाव टाकून स्वतःची किंवा आप्तस्वकीयांची किंवा त्यांच्या मार्फत आणलेली कामे करण्यास भाग पाडत आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत असे घोगरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

तसेच रामदास जगताप हे उपजिल्हाधिकारी म्हणुन प्रशासकीय सेवेत रुजु असले तरी त्यांच्या नावाने त्यांच्या गावच्या परीसरातील काही एजंट लोक त्यांचे नाव सांगून शेतकरी यांच्याकडून पैसे घेऊन कामे घेत असून या कामांसाठी जगताप हे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचारी यांना मेसेज करत ते सांगतील तसे काम करण्यास सांगत आहेत. यामुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले आहेत. तसेच अनेक शेतकरी व अधिकारी त्यांच्या या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त झाले आहेत असेही घोगरे यांनी म्हटले आहे.

 

राजकीय वलय त्यांचे पद व अनेक अधिकारी यांच्याशी असलेली ओळख यामुळे सुरक्षिततच्या कारणास्तव स्वतःच्या नावानीशी कोणी तक्रार करत नाही. यामुळे त्रस्त शेतकरी टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत विचार करत आहेत. गोरगरीब शेतकरी यांच्या व्यथा लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचे फोन कॉल व्हाट्सअप मेसेज इ आवश्यक बाबीची योग्य त्या वरीष्ठ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शिरुर तालुक्याचे मनसे संघटक अविनाश घोगरे यांनी पत्र पाठवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी सदैव उपलब्ध; जगताप

मी शिरुर तालुक्यातील रहिवासी असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे महसुलच्या कामाबाबत मला फोन येत असतात. राज्यात ऑनलाईन सातबारासाठी काम केले असल्यामुळे नागरिक मदतीच्या आणि आपुलकीच्या भावनेने फोन करतात. सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी सदैव उपलब्ध असतो, असे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी म्हटले आहे.

 

पुढे बोलताना जगताप म्हणाले, मी शिरुर तालुक्यातील रहिवासी असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे महसुलच्या कामाबाबत मला फोन येत असतात. त्यावेळी मी अधिकाऱ्यांना सर्वसामान्य लोकांच्या कामासंदर्भात फोन किंवा मेसेज करत असतो. माझ्यावर केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे आहेत. माझ्याबाबत ज्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना मी ओळखत सुद्धा नाही. शिरुर तहसील कार्यालयात सर्वसामान्य लोकांची कामे जर अडत असतील आणि त्यासाठी जर मी त्यांची अडचण दुर व्हावी यासाठी महसुलच्या अधिकाऱ्यांना फोन किंवा मेसेज केला. तर त्यात काय गैर आहे.

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु

शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान

शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

3 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

3 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

3 तास ago

पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने…

3 तास ago

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

6 तास ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

8 तास ago