शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) आज ७८ वा स्वातंत्र्य दिन संपुर्ण देशात आनंदाने साजरा झाला. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पुर्ण झाले असुन ७८ व्या वर्षात पदार्पण होत असताना शिरुर तालुक्यात गावोगावी ध्वजारोहण पार पडले. कोणत्याही गावची ग्रामपंचायत म्हटल कि सरपंच, उपसरपंच तसेच विविध संस्था आणि त्या संस्थेचे पदाधिकारी ध्वजारोहण करतात. हि नेहमीचच प्रथा आहे. तर काही ठिकाणी माजी सैनिकांना सन्मान दिला जातो. परंतु गुनाट (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका सर्वसामान्य महिलेला ध्वजारोहनाचा मान देण्यात आला.

गुनाट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज (दि १५) ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात पार पडले. परंतु याठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य तसेच गावातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा मान घेतला नाही. उलट गावातील कोणतेही राजकीय पद नसलेल्या गितांजली जयवंत भगत या एका सर्वसामान्य महिलेला ध्वजारोहनाचा मान देऊन एक आगळा वेगळा पायंडा पाडला.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले कि महिलांचा सन्मान व्हावा या स्वच्छ उद्देशाने हि संधी दिली आहे. गितांजली भगत या ‘श्रायबर डायनामिक्स’ दूध उत्पादकांबरोबर काम करुन त्यांना स्वच्छ ,निर्भेळ व प्रतिजैवके व बुरशीविरहित दूध उत्पादन करण्यास मार्गदर्शन करत आहेत. भेसळयुक्त तसेच आजारी गायींचे दुध मानवी आरोग्यास घातक असते. एक पवित्र काम यातुन करत असल्यानं अशा कर्तुत्ववान महिलेला संधी देऊन महिला समाजात कुठेही मागे नसुन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करत आहेत.

त्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण महिलेच्या हस्ते व्हावे अशी भुमिका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी मांडली. त्याला शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी दुजोरा देत एक वेगळा पांयडा पाडला. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. गितांजली भगत यांचे सासरे दत्तात्रय भगत यांनी यावेळी शालेय व्यवस्थापन समितीस ५००१ रुपये देणगी दिली.

धक्कादायक; पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे सेल्फीसाठी तरुणाईचा जीवघेणा स्टंट

शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज