कोल्हापूर: तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी अभिवादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे. शिवसेनेमध्ये सर्वांना मायेने आणि जिव्हाळ्याने सांभाळून घेण्याचे कार्य त्या करत होत्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना महिला आघाडीला मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक उपक्रम आज चालू आहेत. विधानपरिषदेची उपसभापती आणि शिवसेना नेता या नात्याने आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, आज माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत. या ठिकाणी स्थानिक आमदार आणि आपल्या राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेले आहे. माँसाहेबांचे संस्कार तुम्ही जगात कुठेही असाल ते पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. याप्रसंगी शिवसेना महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी तसेच, इतर शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…