महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना निर्णयाचे शिवसेनेतर्फे स्वागत

सर्व जातींना समान संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: “वेगवेगळ्या जातींना समान पद्धतीने विकासाच्या संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी आणि विशेष संधी सर्वांपर्यंत पोहोचली का, याचे मूल्यमापन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची आहे,” असे म्हणत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

केंद्र सरकारने नुकतीच जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शिवसेनेतर्फे मनापासून स्वागत करण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही जनगणना केवळ आकडेवारीसाठी नसून, देशाच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक समाजघटकाचा सहभाग आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जातीसंस्थेला विरोध लक्षात घेऊन ही प्रक्रिया राबवली तर, ती वास्तव माहितीच्या आधारे समाजहितासाठी दिशादर्शक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago