आरोग्य

शरीराचा नाजुक अवयव डोळा

डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणका समोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की, मग एकतर चष्मा डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी त्रास घ्यावा लागतो. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच आपण काही घरगुती उपाय करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो.

गुलाबजल थंड असल्यामुळे सहाजिकच ते डोळ्यांसाठी प्रभावी मानले जाते. तसं तर गुलाबजल हे मुड फ्रेश करणे, कांती उजळणे, त्वचा मुलायम करणे अशा अनेक गोष्टीत लाभदायक ठरते. गुलाबजलचा वापर केल्याने दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यात गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे किंवा काळे डाग कमी करण्यासाठी देखील गुलाबजलचा वापर करू शकता.

मोहरीचे तेल डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास लाभदायक ठरते. पायाला तळव्यावर १० मिनिटे मोहरीच्या तेलाने मसाज करावी. असे केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.

नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांची दृष्टी ही सामान्य लोकांपेक्षा अधिक चांगली असते. वजन वाढल्यामुळे डायबिटीज-२ (मधुमेह) असलेल्या लोकांची दृष्टी कमजोर होत जाते. याच कारणामुळे नजर साफ असण्यासाठी सर्वात आधी वजन नियंत्रित असणं गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि दृष्टीत अनेक सकारात्मक बदल घडवू शकता.

बदामाने स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते आणि यासोबतच अनेक लाभ होतात. बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते. बदामात व्हिटॅमिन-ए मोठ्या प्रमाणात आढळते. दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करावे. असे केल्याने दुध आणि बदाम असे दोन्हीतील व्हिटॅमिन-ए मिळतील आणि डोळ्यांची दृष्टी अधिक बळकट होण्यास मदत होईल.

आवळ्यातील ॲंटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतो. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने दृष्टी देखील चांगली राहण्यास मदत होते.

गाजर, अक्रोड, ब्रोकोली, पालक या भाज्यांचा आणि फळांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांचा आहारात समाविष्ट करुन डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

10 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago