महाराष्ट्र

ट्राफिक पोलिसांच धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद…

सोलापूर: सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून 2 ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारु पाजली. राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली सोलापूर शहरात आधीच वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील ट्राफिक विभाग वाहतुकीबाबत कोणतेही धोरण राबवत नाही.
शहरातील प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत असतात. अनेकदा लोक नियमाप्रमाणे दंड भरण्याऐवजी चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं.
आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. ट्राफिक पोलीस अशाप्रकारे चिरीमिरी घेत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बनावट सह्या करून 46 लाखाची फसवणूक, असा उघड झाला ठाण्यातील विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा डाव आधी वाहतुकीचे नियम मोडले तर ट्राफीक पोलीस पावती फाडायचे. त्यासाठी रोख रक्कम घेतली जायची. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहनचालक मोठ्या दंडातून सुटका करुन घ्यायचे.
मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी घेत असल्याचं समोर येत आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago