तळेरे: मुंबई मधील दक्षिण मुंबईत एक नव्या रूपाने श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स ही अत्यंत आदर्श वसाहत प्रस्थापित झाली आहे. सदर वसाहतीमधील पहिलाच गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात सामाजिक भान ठेवून साजरा झाला. ज्यामध्ये डॉक्टर, व्यापारी, स्थापत्य विशारद, नृत्य विशारद यांनी अध्यक्ष श्री. संजय मुरकुटे ह्यांचे मार्गदर्शनाने एकदिलाने स्वतः झोकून दिले होते.
या कार्यक्रमास स्वा. वीर सावरकर चरित्र गायक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र सतीश भिडे ह्यांनी आपल्या सहकारी मंडळींचे साथीने अखंड भारत निर्मितीसाठी गीत वीर विनायकचा तुफानी कार्यक्रम सादर केला.
जेष्ठ समन्वयक रत्नेश भावसार, सुशांत चाचड, निनाद भावे, मेहुल घोसाळकर, प्रसाद दाते, देवदत्त शिरोळकर, केदार वैद्य, सिद्धेश वेदपाठक, हर्षद वैद्य, जेष्ठ गायिका सौ. मंजुश्री देवधर, स्मिताताई दारशेतकर, समीक्षा दारशेतकर, सुरक्षा शिरोळकर, सामाजिक युवा नेता परेश मोघे, दिपा घोसाळकर, विकीता चाचड, डॉ. जितेंद्र कानिटकर, सुरेश शहा, राजेशजी गंगाखेडकर, मनीष परमार, कमल पोळे, केदार जोशी, अमित मोने ह्यांनी एकदिलाने कार्यास स्वतःस झोकून दिले होते.
सदर वसाहतीस जेष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा व विनोद तिवारी ह्यांनी दिलेल्या भेटीमुळे व वेदाचार्य श्री. श्रीराम देवधर ह्यांच्या वेद पठनाने गणेश भक्त आनंदले होते. सदरची वसाहत ही ह्या बहुआयामी व्यक्तींच्या परिश्रमाने कौतुकाचा विषय झाला आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…