महाराष्ट्र

बारामती पोटनिवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे

अहिल्यादेवी होळकर रुग्णालय नामांतरावरून धनगर समाज आक्रमक

बारामती: निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या वेळापत्रकासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी होताना दिसत आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे नाव बदलून दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्याच्या निर्णयावरून धनगर समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडणार असून मतमोजणी मे महिन्यात होणार आहे. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघांतही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे की ते बारामती पोटनिवडणूक लढवणार नाहीत. अजित पवारांबद्दल आदर व्यक्त करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या नामांतराच्या वादामुळे या प्रयत्नांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात धनगर समाज आक्रमक झाला असून विविध संघटनांनी निषेध मोर्चे काढले आहेत. धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, त्यांचा अजित पवार यांच्या नावाला वैयक्तिक विरोध नाही, मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव काढून दुसरे नाव देणे त्यांना मान्य नाही.

जोपर्यंत रुग्णालयाचे नाव बदलण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाज पोटनिवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान उभे राहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago